काळ्या साड्या परिधान करत जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद

काळ्या साड्या परिधान करत जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद
Published on: 
H35203 नाशिक : जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी थाळीनाद आंदोलन करताना अंगणवाडी महिला कर्मचारी. ----------------- काळ्या साड्या परिधान करत जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद ग्रॅच्युइटी, दरमहा पेन्शन, शासकीय कर्मचारी दर्जासाठी आयटकचे आंदोलन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघ (आयटक)तर्फे जिल्हा परिषदेसमोर काळ्या साड्या परिधान करून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे पाच हजार अंगणवाडी केंद्रांमधून दहा हजार अंगणवाडीसेविका व मदतनीस शासनाच्या विविध योजना आणि सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मात्र, या योजनेला ५२ वर्षे पूर्ण होऊनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळावी, यासाठी गेल्या वीस वर्षांपासून विविध प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहेत. मात्र, अद्याप पेन्शन योजनेबाबत ठोस आदेश काढण्यात आलेले नाहीत. परिणामी, आयुष्यभर शासनाच्या योजना राबविणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून, अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅच्युइटीचा लाभ तातडीने लागू करावा, निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन सुरू करावी आणि प्रलंबित प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अंगणवाडी कर्मचारी नेते राजेश सिंग, आयटकचे राज्य सचिव राजू देसले, पद्मा भुजबळ, संजीवनी वाघमारे, कुसुम गांगुर्डे, सुनंदा जाधव, लता क्षीरसागर, संगीता कासार, जया गरड, जिजा जगझाप, जिजाबाई अहिरराव, अन्नपूर्णा अडसुळे, आशा देवढे, छाया कोतवाल, अरुणा बाबा, कल्पना पाटील, मीराबाई जाधव, पूनम पाटील, राजश्री पानसरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.