नाशिक रोड- जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस गेल्या महिन्याभरापासून मानधन न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अनेकजणींच्या खांद्यावर कुटुंबाचा संपूर्ण भार असल्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांचं मानधन अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.