निफाड- आई- वडिलांना मुलगी पोलिस व्हावी असं वाटत होतं, पण मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. आपली ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करायची. तिने ते करूनही दाखवलं. आज ती जपानमधील टोकियो शहरात मेट्रो रेल प्रकल्पावर साइट इंजिनिअर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे ती शिरवाडे वाकद येथील अंकिता संतोष काकड. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाचा श्रीगणेशा, कोपरगावच्या संजीवनी महाविद्यालयातून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगपर्यंतचा प्रवास आणि त्यातून थेट जपानमध्ये मोठ्या पदावर निवड.