फोटो - NSK26H33114
नामपूर : कापडणे (जि. धुळे) येथील कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी पदयात्रेतील सहभागी महिला.
नामपूरच्या महिलांची अन्नपूर्णा मातेसाठी पदयात्रा
---------------------------------------
कापडणे येथे विविध कुळातील भाविकांनी घेतले दर्शन
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. २० : नवरात्रकाळात येथून कापडणे (जि. धुळे) येथील कुलदैवत अन्नपूर्णा मातेच्या दर्शनासाठी पदयात्रेची परंपरा गेल्या सोळा वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. यंदाही यात्रेत वाणी समाजाच्या महिलांसह भाविकांनी सहभाग नोंदविल्याची माहिती पदयात्रेचे संयोजक शरद नेरकर, निवृत्त मुख्याध्यापिका स्नेहलता नेरकर यांनी दिली.
पदयात्रा पाच दिवसांची असते. ठिकठिकाणच्या गावांचे भाविक पदयात्रेचे स्वागत करतात. कापडणे येथील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध भाविकांनी दर्शन घेतले. राज्यभरातील कुलाचारी दर्शन आणि नवस पूर्तीसाठी कापडणे येथे येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून कुलस्वामिनी अन्नपूर्णा मातेची आख्यायिका आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात महाभिषेक, पूजा व आरती, नवचंडीयाग, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम झाले. कापडणे येथील कुंभारटेक परिसरातील हे मंदिर सुमारे १०० वर्षे जुने, १८९१ मध्ये जीर्णोद्धार झाला. नेरकर, बामणे, लोखंडे कुलाचे लोक अन्नपूर्णा देवीला कुलदैवत मानतात. मंदिरात कर्पूरगौरी देवीची मूर्ती असून राज्यभरातून दर्शनासाठी भाविक येतात. नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गदीं होते. सध्याची जागा अपूर्ण पडत असल्याने धामणे रस्त्यालगत पाच एकर जागा घेतलेली असून, तेथे भव्य मंदिराची उभारणी होत आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जयपूर येथून घेण्यात आलेली आहे. या मंदिरात गोशाळा, प्रसादालय असे अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष नेरकर यांनी दिली
कोट...
अन्नपूर्णा धामातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यातील भक्तनिवास पूर्णत्वाकडे असून, मंदिर बांधकामही वेगाने सुरू आहे मंदिर बांधकामाचा अंदाजे खर्च नऊ कोटी रुपये आहे. कुलाचारी भक्तांच्या योगदानातून हे काम सुरू आहे.
- शिरीष नेरकर, अध्यक्ष, अन्नपूर्णा ट्रस्ट