Crime
sakal
नाशिक
Crime News : सटाणा बनावट नोटा प्रकरणाला नवे वळण; डॉक्टरच्या लॅबमध्ये सापडला दारूचा साठा!
Police Raid on Clinical Lab in Antapur : सटाणा- ताहाराबाद रस्त्यावर सटाणा पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी अटक केलेल्या सात जणांपैकी एक असलेल्या डॉक्टरचीच ही लॅब आहे. बनावट नोटांबरोबरच अवैध मद्यविक्रीही या लॅबमधून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
अंतापूर: ताहाराबाद (ता. बागलाण) येथील मातोश्री क्लिनिकल लॅबवर जायखेडा पोलिसांनी छापा टाकला असता विनापरवाना एक लाखांचा विनापरवाना मद्यसाठा आढळून आला, तो जप्त करण्यात आला आहे. सटाणा- ताहाराबाद रस्त्यावर सटाणा पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी अटक केलेल्या सात जणांपैकी एक असलेल्या डॉक्टरचीच ही लॅब आहे. बनावट नोटांबरोबरच अवैध मद्यविक्रीही या लॅबमधून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
