लखमापूर- महाराष्ट्र शासनाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दर वर्षी एक साडी मोफत देण्याची योजना राज्यातील रेशन दुकानांमधून ईपॉस मशिनद्वारे सुरू करण्यात आली आहे, मात्र आजमितीस नाशिक जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार २४६ महिलांनी अजून या साड्या नेल्याच नाहीत. आतापर्यंत ९५ टक्के साड्यांचे वाटप झाले आहे.