धुळे ः टुडे ३ साठी
--
फोटो क्रमांक ः 33819
मुंबई : दुष्काळी निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करताना अनुप अग्रवाल. शेजारी मंत्री जयकुमार रावल, गिरीश महाजन, भरत अग्रवाल.
--
अकरा लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द
-
आमदार अनुप अग्रवाल : दुष्काळी स्थितीमुळे मदतीचा हात
-
किंवा
-
दुष्काळी ११ लाखांचा निधी
मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
-
आमदार अनुप अग्रवाल यांच्यातर्फे मदतीचा हात
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २८ : भाजपचे ज्येष्ठ नेते व उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जाहीर केलेला ११ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांचे सुपुत्र तथा आमदार अनुप अग्रवाल यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी (ता. २८) सुपूर्द केला. या उपक्रमाद्वारे अग्रवाल कुटुंबीयांनी दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ऑक्टोबरच्या सुरुवातीला विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राज्यातील दुष्काळाचे भान राखत बळीराजाला दिलासा देण्यासाठी या सोहळ्यात गायक हंसराज रघुवंशी यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमासह ११ गरजू शेतकऱ्यांना दुभत्या गायींचे वाटप करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित मंत्र्यांसमोर आमदार अग्रवाल यांनी दुष्काळ निवारण निधीसाठी ११ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार मुंबईत झालेल्या कार्यक्रमात आमदार अग्रवाल यांनी हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि भरत अग्रवाल उपस्थित होते. अग्रवाल कुटुंबीयांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल व शेतकरी मदतीच्या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.