esakal | सावधान… मंदिर आणि शाळा उघडत असल्याने घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

suraj mandhare

सावधान… मंदिर आणि शाळा उघडत असल्याने घ्या काळजी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात तब्बल दीड ते दोन वर्षांनंतर शाळा आणि मंदिरे सुरू होत आहेत. त्यामुळे सण-उत्सव आणि शाळेच्या निमित्ताने पुन्हा एकदा गर्दी होणार असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत नागरिकांनी काळजी घेऊन कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

राज्यात सोमवार (ता. ४)पासून शाळा सुरू होत आहेत. त्यापाठोपाठ ७ ऑक्टोबरपासून (घटस्थापना) मंदिरांसह धार्मिक स्थळेही उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे शाळेत आणि मंदिरांसमोर संभाव्य गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले. ते म्हणाले, की कोरोनाच्या दोन्ही लाटांचा जिल्ह्यात प्रादुर्भाव राहिला. शहरात दोन लाख ३० हजार, ग्रामीण भागात एक लाख ५५ हजार, तर मालेगावमध्ये १२ हजार ६२५ यांसह जिल्हाभरात चार लाख आठ हजार ४६३ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आठ हजार ६३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या महामारीत तीन लाख ९८ हजार रुग्ण बरे झाले असले, तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. केवळ त्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशाही स्थितीत ९४० च्या आसपास रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या लाटेत तर भयावह अनुभव आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: नाशिक : अनाधिकृत बांधकाम नियमीतकरणावर दहा वर्षांनंतर फुली


कोरोनाच्या काळात गर्दीमुळे संसर्ग वाढणार नाही याची सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. कोरोना संपत आला असताना निष्काळजीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढले, तर अडचण होईल. त्यामुळे मंदिरांत आणि शाळेत सर्वतोपरी काळजी घेतली जावी. नागरिकांनी स्वत:हून सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे प्रतिबंध नियम पाळावेत.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

हेही वाचा: नाशिक : चार लाखांचा कोरोना रुग्णांना परतावा

loading image
go to top