Kotwal Recruitment: कोतवाल पदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू! 8 ऑक्टोबरपर्यंत मुदत

२३ पैकी ८० टक्के पदे ऑनलाइन, तर १८ पदे आरक्षणानुसार भरणार
Kotwal recruitment 2023
Kotwal recruitment 2023sakal

मालेगाव : तालुक्यात कोतवाल संवर्गातील एकूण २३ पदे रिक्त आहेत. ८० टक्के पदे ऑनलाइन भरण्यात येणार असून, गावनिहाय १८ कोतवाल पदे आरक्षणानुसार भरण्यात येतील. मंगळवारपासून (ता. २६) अर्ज दाखल करता येतील.

पात्र उमेदवारांनी उद्यापासून ते ८ ऑक्टोबरपर्यंत https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे. (Application process for Kotwal posts started Deadline October 8 nashik)

अर्ज भरताना उमेदवारांनी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच ज्या उमेदवरांकडे पदाकरिता आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता नसेल अशा उमेदवारांनी अर्ज करु नये.

अर्जदारांना अर्ज भरण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यासाठी ppbhartihelp@gmail.com या ईमेलद्वारे कळवावे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. कोतवाल पदासाठी परक्षा शुल्क खुला प्रवर्ग ६०० तर मागास प्रवर्गसाठी ५०० रुपये असून, प्रक्रिया शुल्क बँक प्रोसेसिंग चार्जेस वगळून आहे.

नेटबॅकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोन पेद्वारे ऑनलाइन प्रक्रिया शुल्क भरल्यास निवडलेल्या पर्यायानुसार आवश्यक ते बॅंकेचे सेवा शुल्क भरावे लागेल.

ऑनलाइन शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनी त्यांचा व्यवहार यशस्वी झाल्याची खात्री करून घ्यावी. प्रक्रिया शुल्क भरण्याकरिता नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, गुगल पे, फोन पे वापरून होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी पूर्णत: उमेदवाराची असेल.

Kotwal recruitment 2023
Teacher Recruitment : रिक्त जागांमुळं शाळांसमोर पेच; प्राथमिक 1786, माध्यमिक शाळांमध्ये 'इतक्या' शिक्षकांच्या जागा रिक्त

गावनिहाय आरक्षण असे :

इतर मागासवर्ग- रावळगाव, दुंधे, भिलकोट, तळवाडे, पांढरुण, सावतावाडी, जळगाव निंबायती (महिला), चोंढी, घोडेगाव, घोडेगाव चौकी, काळेवाडी, कळवाडी, दापुरे, गिगाव, दहिवाळ, बोधे, आघार खुर्द (महिला), चिंचावड

भटक्या जमाती क- साजवहाळ, पळासदरे

खुला प्रवर्ग - येसगाव बुद्रुक, येसगाव खुर्द, ज्वार्डी खुर्द, निमगाव खुर्द, अजंदे (महिला), अजंदे पाडा, मथुरपाडा, भुईगव्हाण, वनपट, टिंगरी, दहिदी, वजिरखेडे (महिला), डाबली, लेडाणे, मालेगाव कॅम्प, सोयगाव, भायगाव.

विशेष मागास प्रवर्ग - देवघट, साकूर

भटक्या जमाती ड - साकुरी निं., जेऊर, पाथर्डे,

विमुक्त जाती अ- अजंग (महिला), काष्टी, निळगव्हाण, पाडळदे, सायतरपाडे, रोंझे

ईडब्ल्युएस - चिखलओहोळ, देवारपाडे, नाळे, शेंदुर्णी

Kotwal recruitment 2023
UPSC Recruitment 2023 : लोक सेवा आयोग UPSC अंतर्गत एवढ्या पदांवर भरती, लगेच असा करा अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com