बारावी परीक्षेसाठी आजपासून भरता येणार अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावी परीक्षेसाठी आजपासून भरता येणार अर्ज

नाशिक : बारावी परीक्षेसाठी आजपासून भरता येणार अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२ मध्ये होणाऱ्या बारावीच्‍या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता. १२)पासून सुरू होत आहे. नियमित शुल्‍क किंवा विलंब शुल्‍कासह विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहेत.

दोन टप्प्‍यांत ही प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्‍या टप्प्‍यात नियमित विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. सोबतच नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्‍या खासगी विद्यार्थ्यांनी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचीही अर्ज ऑनलाइन मागविले आहेत. या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्‍थळावर भरायचा आहे.

हेही वाचा: एसटी कामगारांचा कुटुंबीयांसह गेवराई तहसीलवर मोर्चा

शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून सबमिट केल्‍यानंतर त्‍यांच्‍या महाविद्यालय लॉगइनमधून प्री-लिस्‍ट उपलब्‍ध करून दिली जाईल. महाविद्यालयांनी त्‍याची प्रत काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेली माहिती, जनरल रजिस्‍टच्‍या माहितीनुसार पडताळून अचूक असल्‍याची खात्री करून विद्यार्थ्यांची स्‍वाक्षरी घ्यायची आहे. यासह अन्‍य सूचना महाविद्यालयांसाठी शिक्षण मंडळाने केल्‍या आहेत.

अशी असेल मुदत

नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी नियमित शुल्‍कासह शुक्रवारपासून ते २ डिसेंबरपर्यंत मुदत असेल, तर अन्‍य सर्व प्रकारच्‍या विद्यार्थ्यांना नोंदणीची मुदत ३ ते ११ डिसेंबरदरम्‍यान आहे. सर्व विद्यार्थ्यांना विलंब शुल्‍कासह १३ ते २० डिसेंबरदरम्‍यान ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउनलोड करून बँकेत चलनाद्वारे शुल्‍क भरायची मुदत २३ डिसेंबरपर्यंत असेल.

loading image
go to top