Nashik News: आधी कुलगुरू पुणे विद्यापीठाचे मग मुक्‍तचे? काही संभाव्‍य उमेदवारांचे नाव चर्चेत

YCMOU & SPPU
YCMOU & SPPUesakal

Nashik News : रखडलेली कुलगुरुपद निवडीची प्रक्रिया गतिमान झालेली असताना आधी कुठल्‍या विद्यापीठासाठी कुलगुरूंच्या नावाची घोषणा होते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे समितीच्‍या मुलाखती नियोजित असताना, कदाचित ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतरच यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदासाठी निवड जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. (appointment of Vice Chancellor of Pune University ycmou Some potential candidates being discussed Nashik News)

राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कुलगुरू निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याचे प्रयत्‍न करण्यात आले होते. ही प्रक्रिया अंतिम टप्यांत असताना न्‍यायालयातील सुनावणीमुळे कुलगुरू निवड प्रक्रिया राष्ट्रीय स्‍तरावर एकसंध ठेवण्याचे सूचित करण्यात आले होते.

यानंतर राज्‍यात सत्तापालटदेखील झाली. विविध पारंपारिक विद्यापीठांच्‍या कुलगुरू निवडीच्‍या प्रक्रियेला वेग आला होता. राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलगुरू निवडीसाठी काही दिवसांपूर्वीच समितीने संभाव्‍य उमेदवारांच्‍या मुलाखती घेतल्‍या होत्‍या.

यानंतर पाच उमेदवारांची यादी राज्‍यपाल कार्यालयाकडे सादरदेखील करण्यात आली होती. नुकतेच राज्‍यपालांनी या उमेदवारांच्‍या मुलाखती घेतल्‍या असल्‍याची माहिती मिळते आहे. परंतु कुलगुरू पदासाठी कुठल्‍याही नावाची घोषणा करण्यात आलेली आहे.

यादरम्‍यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या कुलगुरू निवडीसाठी नियुक्‍त केलेल्‍या समितीने २७ संभाव्‍य उमेदवारांची यादी जारी केलेली आहे. या उमेदवारांच्‍या मुलाखती १८ आणि १९ मेस नियोजित आहे.

मुलाखती होताच प्रक्रियेनुसार पाच संभाव्‍य उमेदवारांच्‍या नावाची शिफारस तातडीने राज्‍यपालांकडे केले जाण्याची शक्‍यता आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीनंतर मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलगुरूंच्‍या नावाची घोषणा केली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

YCMOU & SPPU
SAKAL Impact : 3 टँकरद्वारे पाथर्डी भागात पाणीपुरवठा! पाइपलाइनसाठी पुन्हा मोजमाप

किंवा दोन्‍ही विद्यापीठांसाठी कुलगुरूंची नियुक्‍ती एकाच वेळी जाहीर होण्याचाही तर्क लावला जात आहे. अशा अंदाजांप्रमाणेच नियुक्‍त्‍या जाहीर होतात, की प्रक्रिया पूर्ण झालेल्‍या मुक्‍त विद्यापीठासाठी कुलगुरूंची नियुक्‍ती केली जाते, याकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून राहणार आहे.

काही उमेदवारांची दोन्‍हीकडे दावेदारी

मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदासाठी संभाव्‍य पाच उमेदवारांच्‍या यादीतील दोघांचा समावेश मुलाखतीसाठी पाचारण केलेल्‍या पुणे विद्यापीठाच्‍या २७ संभाव्‍य उमेदवारांच्‍या यादीत आहे. प्रदीर्घ अनुभव व पात्रतेशी निगडित अटींची पूर्तता होत असल्‍याने या उमेदवारांची कुलगुरू निवडीसाठी शक्‍यता अधिक आहे.

अशात कुणाला कुठल्‍या विद्यापीठाची जबाबदारी द्यायची, याबाबत खल होऊन यानंतरच अंतिम नावाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

YCMOU & SPPU
Malaria Disease : नाशिक विभाग राज्यात ‘मलेरिया’ कमी करण्यात अव्वल : डॉ. पी. डी. गांडाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com