esakal | नाशिक मनपातील रिक्त पदे भरण्यास मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

nmc

नाशिक मनपातील रिक्त पदे भरण्यास मान्यता

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेतील रिक्त पदांबरोबरच नवीन पदनिर्मितीला शासनाने मान्यता दिल्याचे श्रेय पालकमंत्री छगन भुजबळ यांना देताना उर्वरित आकृतिबंध त्वरित मंजूर करावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. राज्य शासनाने शुक्रवारी (ता. १८) महापालिकेच्या पाच विभागांतील ६३५ पदे भरण्यास मान्यता दिली. त्या पार्श्वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले.

पदे भरणे अतितातडीचे; भरण्यासाठी आग्रह

पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे दोन ते तीन वेळा रिक्त जागांचा विषय मांडला होता. महापौर म्हणून भुजबळ यांनी मुंबईत काम पाहिले असल्याने मनुष्यबळ कमी असल्यास किती अडचणींना सामोरे जावे लागते, ही बाब पटवून दिली होती. महापालिकेचा आकृतिबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पडून आहे. त्यातील वैद्यकीय, अग्निशमन दल, लेखा व लेखापरीक्षण, घनकचरा व्यवस्थापन तसेच अभियांत्रिकी विभागातील पदे भरणे अतितातडीचे असल्याने किमान त्याला मान्यता मिळावी, यासाठी आग्रह होता. आता शासनाने पाच विभागांतील ३७ संवर्गातील ६३५ पदे भरण्यास मान्यता दिली आहे. महापालिकेत २० वर्षांपासून भरती झालेली नाही. सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांच्यासमवेत भुजबळ यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या. भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पदे मंजूर झाल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा: विवाह मुहूर्त टळले, तर वर्ष वाया जाणार... !

महापौरांनी मानले पालकमंत्री भुजबळ यांचे आभार

महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पडून आहे. त्यातील ६३५ पदांना मान्याता मिळाली असली, तरी उर्वरित आकृतिबंध त्वरित मंजूर करावा. १९९८ नंतर भरती झालेली नाही. त्यामुळे मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. तातडीने सर्वच रिक्त पदे मंजुरीसाठी भुजबळ यांनी पाठपुरावा करावा.

-सतीश कुलकर्णी, महापौर