नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना ऊत आला होता. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, डॉ. हिरे बुधवारी (ता. २) दुपारी १२ वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात शेकडो समर्थकांसह अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत.