प्रेमप्रकरणातून वाद | युवकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न

burn
burn sakal

देवळा : प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाल्याने व त्यातून लग्न मोडल्याच्या संशयावरून लोहोणेर (ता. देवळा) येथे शुक्रवार (ता. ११) युवकास मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला. युवकाची प्रकृती गंभीर असून, त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहोणेर येथील प्लंबिंग व्यावसायिक युवक गोरख काशीनाथ बच्छाव (वय ३१) याची रावळगाव (ता. मालेगाव) येथील युवतीशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने गोरखकडून तिला लग्नाची मागणी होऊ लागली.

मात्र या प्रकारास युवतीच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याने यातून वाद निर्माण होऊ लागले. दरम्यान, युवतीचे लग्न इतर ठिकाणी जमत असले तरी हा विवाहसंबंध गोरखच मोडत असल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांचा बळावत गेला. आज दुपारी साडेअकराच्या सुमारास रावळगाव येथील कुटुंबीय लोहोणेर येथे आले. चर्चेत योग्य तोडगा न निघाल्याने वाद वाढला. त्याचे पर्यावसान म्हणजे हाणामारीत झाले. युवतीकडील कुटुंबीयांकडून गोरख यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com