सिन्नरमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार नाशिक शहर परिसरात येऊन चोरी, घरफोड्या करायचा. घरफोडी केल्यावर मिळालेला ऐवज विकून तो गोव्याला मौजमजा-मस्ती करायचा. नाशिक रोड पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक निरीक्षक योगेश पाटील यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना या सराईताला अटक करण्यासाठी त्याच्या सासरवाडीला सापळा रचला आणि त्यात तो अलगद अडकला.