वनोलीचा भूमिपुत्र कजाकिस्तान येथील स्पर्धेचा 'Iron Man'

army man nisarga bhamre
army man nisarga bhamreesakal

वीरगाव (जि. नाशिक) : नुकत्याच कजाकिस्तान च्या नुर सुलतान या शहरात आयर्न मॅन ही स्पर्धा पार पडली यात नाशिक जिल्ह्यातील सुमारे १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धकांमध्ये वनोली ( ता.बागलाण) येथील मूळ रहिवासी निसर्ग भामरे याने निर्धारित कालावधीच्या आत तीनही स्पर्धा जिंकल्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंपुढे आदर्श निर्माण केला आहे.यात ३.८ किमी स्विमिंग,१८० किमी सायकलिंग व ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते. (army man nisarga bhamre of Vanoli became Iron Man of competition in Kazakhstan nashik Latest Marathi News)

निसर्ग भामरे हा मूळ वनोली येथील रहिवाशी असून सद्य स्थितीत नाशिक येथे वास्तव्यास आहे. निसर्ग भामरे याला लहान पणापासून सायकल चालविण्याची खुप आवड होती.त्यामुळे त्याने शिक्षण घेत असताना सायकलच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.

हळूहळू त्याचा सायकल चालविणे हा छंद झाला.नाशिक येथील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला व विविध स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत.निसर्ग भामरे हा नॅशनल प्लेअर असून उत्तराखंड व कर्नाटक येथे संपन्न झालेल्या सायकलिंग च्या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

रोड सायकलिंग मध्ये रोड सायकलिंग व एमटीबी सारख्या स्पर्धेत त्याने अनेकविध पदके आपल्या नावावर केली आहेत. १९ वर्षीय निसर्ग भामरे याने सायकलिंग चा आपला छंद जोपासून सिव्हील इंजिनिअरिंग चे स्वप्न देखील पूर्ण केले आहे.

वनोली सारख्या खेड्यातील हा भूमिपुत्र आहे. कजाकिस्तान येथील स्पर्धा जिंकून "आयर्न मॅन" हा किताप त्याने पटकावल्यामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.लवकरच वनोली येथे त्याचा सत्कार करण्यात येणार आहे.

" खरे तर ग्रामीण भागाच्या भूमीपुत्राला कजाकिस्तान येथील नूर सुलतान या शहरात होणाऱ्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करायला मिळाले हाच माझ्यासाठी मोठा अभिमान आहे." - निसर्ग भामरे, वनोली ( ता.बागलाण)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com