नाशिक -अर्नाळा- शिर्डी बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका सिग्नलजवळ झाडाखाली थांबलेल्या प्रवाशावर जाऊन धडकली. यात अपघातात एक महिला आणि एका पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. संतोष एकनाथ संसारे (वय ४८, रा. लेखानगर, सिडको) आणि रूपाली सचिन काळे (४२, रा. नारायणबापूनगर, जेल रोड) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.