Nashik News : 'ते' बालक डोळे झाकून रंगवतात चित्र अन्‌ ओळखतात आकृती...!

Students
Studentsesakal

नाशिक : डोळ्यांवर पट्टी (ब्लाइंड फोल्‍ड) बांधलेली असताना ते बालक हुबेहुब चित्र रंगवत होतं. कार्डवरील आकृती, अंक सहज ओळखत होतं. आश्‍चर्य वाटलं ना तुम्हाला? पण हो ! कुठल्‍या पंचतारांकित शाळेतील हे सामान्य विद्यार्थी नाहीत. ती आहेत, विशेष बालके. आपल्‍यातील क्षमता विकसित करत चमत्‍कार वाटावा, अशी कामगिरी करून दाखवत होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्‍या ‘प्रज्ञा योग'च्‍या प्रशिक्षणातून या बालकांनी आपल्‍यातील क्षमता वृद्धींगत करत सहाव्‍या इंद्रियांचा (सिक्‍स सेन्‍स) प्रभावी वापर करून दाखवलायं. (Art of Living Pradnya Yoga useful for visually impaired deaf and dumb students Nashik News)

दैनंदिन जीवनात उद्‌भवणाऱ्या समस्‍यांपासून शिक्षण घेताना दृष्टीबाधित, मूकबधिर विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. या बालकांमधील सहावे इंद्रिय (सिक्स सेंन्‍स) जागृत करत त्‍यांच्‍या क्षमता वाढविण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे प्रज्ञा योगचे प्रशिक्षण दिले जाते. सातपूर येथील ‘नॅब’ स्कूलमधील दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे औचित्‍य साधत प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आला. तसेच गंगापूर रोडवरील श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयात प्रशिक्षकांनी दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना प्रज्ञा योगचे प्रशिक्षण दिले.

नाशिकमध्ये पडसाद आणि नाशिक रोड येथील शासकीय अंधशाळेतील विद्यार्थ्यांना यापूर्वी हे प्रशिक्षण देण्यात आले. आर्ट ऑफ लिव्‍हिंगचे विश्‍वस्‍त विजय हाके यांच्‍या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये आर्ट ऑफ लिव्‍हिंगच्‍या चिल्‍ड्रेन ॲण्ड टिन्‍स विभागाच्‍या संचालिका श्रेया चुग यांच्‍या नेतृत्‍वात राबविलेल्‍या या उपक्रमाचे समन्‍वय डॉ. फलक डोशी, संध्या माने, किरण शिंदे यांनी केले. प्रशिक्षक रुक्मिणी देवी, त्रिलोकनाथ त्रिपाठी, प्रेरणा तिवारी यांच्‍यासह स्‍वयंसेवकांचे सहकार्य लाभले.

प्रशिक्षणाचे स्वरूप

प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना डोळे झाकून सहावे इंद्रिय जागृत करण्यासाठी प्रोत्‍साहित केले जाते. त्‍यासाठी प्राणायाम व ध्यान करून घेण्यात येते. आंतरमनाशी झालेल्‍या संवादातून ही बालक रंग ओळखणे, अचूकपणे रंगविणे, वाचन करणे, कार्डवरील चित्रकृती ओळखणे आदी बाबी सहजरित्‍या करू शकतात. या विद्यार्थ्यांच्‍या शिक्षकांना यासंबंधी प्रशिक्षित करताना, सातत्‍याच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांच्‍या क्षमतांचा विकास साधला जातो आहे. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणानंतर सकारात्‍मक परिवर्तन घडले असल्‍याचे संशोधनातून समोर आले आहे.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Students
Nashik News : अबब! ओझरला 90 हजार रुपये किमतीच्या डुकरांची चोरी

विद्यार्थ्यांच्‍या सर्वांगिण विकासासाठी प्रभावी

विशेष मुलांसोबत सामान्‍य मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे. आजवर पाच ते अठरा वर्षे वयोगटातील देशातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्‍हिंगतर्फे हे प्रशिक्षण दिले आहे. आकलन क्षमता, स्‍मरणशक्‍ती, एकाग्रता वाढीसोबत कल्‍पकता विकसित होण्यास मदत होत असल्‍याचे संशोधनातून समोर आले. स्‍वतःसह कुटुंबासाठी चांगले निर्णय घेणे, चांगल्‍या-वाईटातील फरक ओळखण्याप्रमाणे अन्‍य क्षमता विकसित होत असल्‍याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर मंगळवारी श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयातील समारोप कार्यक्रमात आमदार प्रा. देवयानी फरांदे उपस्‍थित होत्‍या. विद्यार्थ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून रंगवलेले चित्र अन्‌ फलक वाचन केल्‍याचे कौशल्‍ये पाहिल्यावर त्‍यांनी उपक्रम व विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले.

ओम श्री सस्वत्यै नमोनमः
ओम सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरुपिणि

विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा
ओम श्री सस्वत्यै नमोनमः

"चेतनाशक्‍ती ही पुरातन क्षमता असून गुरुकुलच्‍या माध्यमातून विद्यार्थी आत्‍मसात करत होते. श्री श्री रविशंकर यांच्‍या सूचनेनुसार विद्यार्थ्यांमध्ये चेतना जागृत करण्यासाठी प्रज्ञा योग शिबिर घेतले जात असून सकारात्‍मक प्रतिसाद मिळत आहे. विशेष बालकांसाठी मोफत उपक्रम राबविला जात असून त्‍यांच्‍या क्षमता वाढविण्यात यश येत आहे."

- श्रेया चुग, क्षेत्रीय संचालिका, मुले व युवक विभाग, आर्ट ऑफ लिव्‍हिंग

"लहान मुलांमधील प्रज्ञा चक्षू जागृत करताना आंतरमनाची शक्‍ती विकसित केली जाते. कोरोनानंतरच्‍या काळात बालकांमध्ये मानसिक समस्‍यांमध्ये वाढ झालेली असताना एकाग्रता वाढविण्यासह स्‍मरणशक्‍तीचा योग्‍य विकास साधला जातो. विशेष मुलांसाठी हे प्रशिक्षण अत्‍यंत उपयुक्‍त ठरत आहे." - डॉ. फलक डोशी, समन्‍वयक

"प्रज्ञा योग प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांमध्ये सकारात्‍मक परिणाम जाणवतो आहे. बालकांकडून सुलभतेने केल्‍या जाणाऱ्या कृती आवाक केल्‍याशिवाय राहत नाहीत. या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्‍हींगतर्फे अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. "
-विजय हाके, विश्‍वस्‍त, आर्ट ऑफ लिव्हिंग.

"शाळेत प्रशिक्षण उपक्रम राबविल्‍यानंतर विद्यार्थ्यांच्‍या क्षमता विकसित होण्यास मदत झाल्‍याचे जाणवत आहे. त्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढला असून शैक्षणिक जीवनात व वैयक्‍तिक जीवनात प्रज्ञा योगाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. "- संतोष पाटील, मुख्याध्यापक, माई लेले श्रवण विकास विद्यालय.

Students
Measles Disease : नाशिक जिल्ह्यात गोवरसाठीही आता विलगीकरण कक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com