Latest Crime News | विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी कलाशिक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

molestation

Nashik Crime News : विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी कलाशिक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा

नाशिक : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी कलाशिक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. अशोक रघुनाथ नागपुरे (वय ५७, रा. गजपंथ स्टॉप, म्हसरूळ) असे या कलाशिक्षकाचे नाव आहे. (Art teacher sentenced to hard labor in case of molestation of female student Nashik Latest Crime News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Nashik News : पंचवटीतील NMC संकुलातील गाळे वापराविना धूळखात पडून

आरोपी नागपुरे याने सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. पंचवटी पोलिस ठाण्यात पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीनुसार, आरोपी अशोक नागपुरे याने रेखाटन शिकविण्याच्या बहाण्याने दुचाकीवर पाठीमागे बसून तिचा वारंवार विनयभंग केला होता. याचप्रकारे त्याने दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचाही विनयभंग केला होता. तसेच पेंटिंग शिकविताना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिस उपनिरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे व रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहत त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यात नागपुरेविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी नागपुरे यास ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एम. एम. पिंगळे, पी. आर. चौधरी यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा: Nashik News : पेठ रोड दुरुस्तीसाठी रहिवासी आक्रमक; NMC, लोकप्रतिनिधीच्या विरोधात घोषणाबाजी