सायकलिंग : आरोग्यासाठी उत्तम व्यायाम

Latest Marathi Article : मानसिक ताणतणाव, जंकफूड व सभोवतालचे प्रदूषण यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
 Cycling
Cycling esakal

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

मानसिक ताणतणाव, जंकफूड व सभोवतालचे प्रदूषण यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आपले शारीरिक आरोग्य योग्य रीतीने लाभण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्रयोग करत असतो. यात प्रामुख्याने योगा, ध्यान, वॉकिंग, रनिंग, स्वीमिंग, सायकलिंग केली जाते. सायकलिंग हा असा व्यायाम आहे, की तो तुमच्या शरीराची लयबद्ध रीतीने योग्य हालचाल घडवून आणतो व कोणत्याही वयोगटातील व्यक्ती मग ती पुरुष असो अथवा स्त्री तो करू शकते. (article by Author Adv Nitin Thackeray Cycling Great exercise for health )

म्हणूनच आजच्या स्थितीला सायकलिंग हा शरीरासाठी योग्य आहे. योग आणि इतर व्यायाम प्रकरांप्रमाणेच सायकलिंगही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे तुम्ही फिटनेस तर नक्कीच मिळवू शकता, मात्र त्याचसोबत तरुण दिसण्यासाठी सायकलिंगची मदत होऊ शकते. सायकलिंगमुळे फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यास मदत होते.

निरोगी हृदयासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. व्यायाम म्हणून काही तास सायकलिंग केल्यास रक्तपेशी आणि त्वचेत ऑक्सिजनचे पुरेसे प्रमाण उपलब्ध होते, जेणेकरून त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते. त्यामुळे तरुण दिसण्यासाठी सायकलिंगचा नक्कीच फायदा होतो. सायकलिंगमुळे रोगप्रतिकारकपेशी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

सायकलिंगचे फायदे

सायकलिंग करणाऱ्यांच्या मेंदूच्या पेशी अधिक सक्रिय असल्याचा अभ्यास समोर आलाय. तसेच नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. तुम्ही दिवसा योग्य वेळी सायकलिंग केली, तर तुम्हाला रात्री चांगली झोप लागते. सकाळी सायकलिंग करताना थकवा आला तरी नंतर संपूर्ण दिवस चांगली एनर्जी राहते आणि झोपही चांगली लागते.

सायकलिंगमुळे शरीराचे अनेक स्नायू मजबूत होतात. शिवाय रक्ताभिसरणही चांगले होते. यामुळे लैंगिक क्षमता वाढण्यासही मदत होते. वजन कमी करण्यापासून तर मसल्स बनविण्यापर्यंत, तुम्ही योग्य व्यायामप्रकारचा शोध घेत असाल तर सायकलिंग तुमच्यासाठी अतिशय योग्य पर्याय ठरू शकतो. सायकलिंगमुळे स्टॅमिना वाढतो, तसेच हृदयासाठी ते चांगले असते, असे जाणकार म्हणतात. (latest marathi news)

 Cycling
समाजमन : शरीराच्या तापमानाविषयी सजग व्हा..!

गिअर व नॉनगिअर

वजन कमी करण्यासाठी कोणती सायकल योग्य, असा विचार अपण नेहमी करतो. मात्र गिअर व नॉनगिअर या दोन्ही प्रकारच्या सायकलिंग त्यासाठी योग्य आहेत. भूतकाळात देखभालीच्या समस्यांमुळे लोक सहसा गिअर सायकलबद्दल चिंतित होते. कारण दुरुस्तीबद्दल मर्यादित सायकल मॅकेनिक माहीत होते. क्वचितच लोक स्वत:ची देखभाल करतात, ज्यामुळे उच्च देखभाल खर्च येतो. यामुळे रायडर्समध्ये एक गैरसमज निर्माण झाला, की गिअर सायकल चांगली नाही.

हायब्रीड सायकलला प्राधान्य

तथापि, प्रत्येकाच्या अनुभवांवर आधारित, वजन कमी करण्याच्या प्रवासासाठी गिअर सायकल अधिक फायदेशीर आहे. सायकल चालविण्याच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये, जेव्हा तुमच्या पायात ताकद कमी असते, तेव्हा गिअर सायकल पेडल करणे सोपे असते. नवशिक्यांसाठी दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी सातत्य आणि आत्मविश्वास विकसित करण्यात मदत करते. एखादी व्यक्ती नेहमी सात गिअर सायकलने सुरू करू शकते, जी ऑपरेट करणे सोपे आणि देखरेख करणेदेखील सोपे आहे.

सायकलिंग सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

१) डोक्याची काळजी घ्या ः असे म्हणतात, की ‘सिर सलामत तो पगडी पचास!’ हे सायकलिंगबाबतही लागू पडते. सायकल बाइक इतक्या वेगात जात नसली तरी सायकलिंगमुळे अपघात होऊ शकतो. म्हणून सायकलिंग करताना नेहमी हेल्मेट सोबत असू द्यावे.

२) कपड्यांची योग्य निवड ः सायकलिंग करताना ढिले कपडे घालू नयेत. अंगासोबत असलेले आरामदायी कपडे घालायला हवेत. विशेषत: स्त्रियांनी सायकलच्या चाकात अडकू शकतील, असे ओढणी किंवा घेरदार कपडे टाळावेत, सहजपणे त्यात शरीराची हालचाल करता यावी असे कपडे शक्यतो निवडावेत.

 Cycling
समाजमन : मैदानी खेळाने सर्वांगीण विकास

३) गिअरचा योग्य उपयोग ः गिअरचा योग्य उपयोग हे सायकलिंगचे महत्त्वाचे तत्त्व आहे. सायकल चढावर असेल तेव्हा छोट्या गिअरचा वापर करायला हवा. त्यामुळे तुमच्या गुडघ्यांना त्रास होणार नाही. जास्त वेळ वरच्या गिअरमध्ये सायकल चालवू नये. यामुळे गुडघ्यांना त्रास होतो.

४) सायकलची योग्य निवड ः सायकलिंग करताना योग्य सायकलची निवड हाही एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सायकलचे सगळे पार्ट व्यवस्थित काम करत आहेत का, हे बघणे गरजेचे असते.

५) बूट आवश्यक ः सायकलिंग करताना नेहमी बूट घालायला हवेत. चप्पल किंवा स्लिपर पॅडलवरून स्लिप होण्याचा धोका असतो. बूट घातल्याने आरामदायी वाटते आणि सायकलिंग सोपे होते.

६) पोझिशन बदलत राहा ः सायकल चालविताना आपल्या बसण्याच्या स्थितीत सतत बदल करत राहा. हँडलवरील आपले हातसुद्धा अधूनमधून पुढे-मागे करत राहिले पाहिजे.

७) इयरफोन वापरू नका ः सायकलस्वार आणि इयरफोन हे समीकरण सर्रास दिसते. पण हे चुकीचे आहे. कानात इयरफोन असल्यास हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतो.

८) मान ताठ ठेवा ः सायकल चालविताना मानदुखीचा त्रास होऊ नये म्हणून मान नेहमी सरळ ठेवली पाहिजे. तसेच मान ताठ ठेवल्याने रस्त्यात येणारे अडथळेसुद्धा स्पष्ट दिसतात.

१०) हळूहळू सुरवात करा ः तुम्ही नव्याने सायकल चालविण्यास सुरवात करणार असाल, तर आधी कमी अंतरासाठी आणि हळू सायकल चालवा. जसजसा अनुभव वाढेल तसतसा वेग आणि अंतर वाढविले तर हरकत नसते.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

 Cycling
समाजमन : मतदानाचा पवित्र हक्क बजावा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com