सणासुदीच्या काळात मिठाईची तपासणी होणार

सणासुदीच्या काळात मिठाईची तपासणी होणार
Published on: 
मिठाईत नियमबाह्य रंग वापरल्यास कारवाई हॉटेल, स्वीट मार्ट व्यावसायिकांना सूचना; वारंवार तेल वापरणे टाळा नंदुरबार, ता. १३ : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व हॉटेल व स्वीट मार्ट व्यावसायिकांना अन्नपदार्थांमध्ये नियमबाह्य कृत्रिम रंगांचा, तसेच वारंवार तळण्यासाठी वापरलेल्या तेलाचा वापर टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संकेत सदाफुले यांनी दिली आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार शहरातील हॉटेल व स्वीट मार्ट व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत शिजवलेल्या अन्नपदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर करू नये, तसेच मिठाईमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार निर्धारित मर्यादेतच रंगांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या. अन्नपदार्थ तळण्यासाठी तेच तेल वारंवार वापरणे टाळावे. खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता, गुणवत्ता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. सणासुदीच्या काळात अन्न आस्थापनाची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान नियमबाह्य रंगांचा वापर किंवा अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करून स्वच्छ व सुरक्षित वातावरणात व्यवसाय करावा. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com