भोंदू अरुण पाटीलची ‘अटकपूर्व’साठी न्यायालयात धाव

भोंदू अरुण पाटीलची ‘अटकपूर्व’साठी न्यायालयात धाव
Published on: 
भोंदू अरुण पाटीलची ‘अटकपूर्व’साठी धाव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून तब्बल साडेसात लाखांना गंडा घालणार्या भोंदू अरुण पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सोमवारी (ता. २६) सुनावणी होणार आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार भोंदू अरुण धोंडू पाटील (रा. मोतीवाला कॉलेजसमोर, शिवाजीनगर, गंगापूर शिवार) यांच्याविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा १९ तारखेला दाखल झाला आहे. संशयित अरुण पाटील गुन्हा दाखल होताच पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गंगापूर पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके मागावर असताना पाटील याने गुरुवारी (ता. २२) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. या वेळी अरुण पाटीलतर्फे ॲड. राजेश आव्हाड न्यायालयासमोर उपस्थित होते. सरकार पक्षाचे सहायक अभियोक्ताही या वेळी उपस्थित होते. यावर सोमवारी (ता. २६) सुनावणी होणार आहे. संशयित पाटील याने केवळ पनवेलच्या दांपत्यालाच नव्हे, तर अशा प्रकारे दैवीशक्ती आणि मंत्र-तंत्राचे आमिष दाखवून नाशिकसह परजिल्ह्यातील अनेक लोकांना जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. सध्या पोलिसांनी आणि महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनानंतर काही इतर पीडितही संपर्कात येत असल्याचे समजते. भोंदूला अटक होताच त्याच्यावर फसवणुकीच्या तक्रारदारांची आणि पीडितांची संख्या मोठी वाढेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com