NSK26H33504
जळगाव : आर्य गोला याचा सत्कार करताना डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. पराग नारखेडे, डॉ. प्रमोद चौधरी, प्रा. रवी पवार.
--------------------
आर्य गोलाची राज्यस्तरीय
बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
------
दमदार कामगिरीचे फलित; महाविद्यालयाकडून अभिनंदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२५ : येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्य गोला याची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मनपा जिल्हास्तरीय व विभागीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.
आर्यने बॅडमिंटनमधील कौशल्य, मेहनत व सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर जिल्हा व विभागीय स्तरावर प्रभावी कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्याला राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही आर्य उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. आर्यच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष चौधरी, सचिव डॉ. पी. आर. चौधरी, उपाध्यक्ष सुनील पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग नारखेडे, उपप्राचार्य प्रीती बोंडे, क्रीडा संचालक डॉ. प्रमोद चौधरी, प्रा. रवी पवार यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.