अंबासन- करंजाडी खोऱ्यातील रस्त्यावरील आसखेडा ते बिजोटे गावादरम्यान दीड महिन्यांपासून साईड पट्टी खोदून ठेवल्याने वाहतूकीसाठी धोकादायक ठरत आहे. परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त केला आहे. संबंधित ठेकेदाराने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.