धुळे : टुडे पान ३ किंवा ४ साठी...
--
फोटो क्रमांक : 35275
दोंडाईचा : गटप्रवर्तकांना शासन सेवेत सामावून घ्यावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यालयात प्रतिनिधींकडे देताना राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचे पदाधिकारी.
--
गटप्रवर्तकांना शासन सेवेत
सामावून घेण्याची मागणी
--
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनातून वगळल्याने नाराजी
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आशा गटप्रवर्तकांचा शासन निर्णयात समावेश करून समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेने केली. याबाबत मुख्यमंत्री तसेच पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
-
२००९-१० पासून जिल्हा आरोग्य विभागात गटप्रवर्तक कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. नियुक्तीवेळी त्यांच्याकडून शंभर रुपयांचा बॉण्ड घेण्यात आला होता. मात्र २०१७ नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेचे स्वरूप मानधन तत्त्वावर केले. शासनाने ३० जूनला काढलेल्या निर्णयानुसार १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनास मान्यता दिली, पण त्यातून गटप्रवर्तक पद वगळले. गेली १६ वर्षे आणि कोविड काळातही काम करूनही हा अन्याय झाल्याने २००९-१० पासूनची सेवा ग्राह्य धरून सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर आयटकचे राज्य अध्यक्ष राजू देसले, जिल्हा अध्यक्ष वसंतराव पाटील, साहेबराव पाटील यांच्यासह कोकीळा जाधव, नम्रता पाटील, शोभा कोळी, धनश्री सोनवणे, गायत्री ठाकरे, जयश्री शिरसाट, सुवर्णा पाटील, सुशीला माळी, मालूबाई पवार, छायाबाई बैसाणे, प्रतिभा देसले, स्वाती वाघ, अनिता सिसोदे, सरला बोरसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.