‘आशा कार्यकर्त्यांना’ टॅब

‘आशा कार्यकर्त्यांना’ टॅब
Published on: 
फोटो : 34675 वाडीवऱ्हे : आशा कर्मचाऱ्यांना टॅबचे वाटप करताना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सीईओ ओमकार पवार. … ‘आशा कार्यकर्त्यांना’ टॅब --- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा वाडीवऱ्हे येथे दौरा; बचत गट महिलांशी संवाद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशा कार्यकर्त्या महिलांना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले. आरोग्यविषयक माहितीचे संकलन आणि डिजिटल नोंदींच्या माध्यमातून कामकाज अधिक प्रभावी करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करत डॉ. गेडाम यांनी आरोग्य विभागासह बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला. वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) येथे शुक्रवारी (ता. ६) डॉ. गेडाम व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी भेट दिली. पशुसंवर्धन विभागाच्या वैरण बियाणे वितरण योजनेंतर्गत १९ शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण झाले. ग्रामपंचायतीच्या सीएसआर निधीतून उभारलेल्या कापडी पिशवी विक्रीच्या एटीएमचे उद्‌घाटनही झाले. तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. महेश भालेराव, पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष पजई, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वरी भांड, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. गौरव मगर उपस्थित होते. या दौऱ्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी महेश वळवी, प्रशासक रवींद्र अहिरे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कराळे, ग्रामपंचायत अधिकारी किशोर दळवे, उपअभियंता संजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद कांबळे, वाडीवऱ्हे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, विस्तार अधिकारी पांडुरंग पाडवी आणि कृणाल वाघ उपस्थित होते. ... महिलांचे आर्थिक सक्षमीकरण विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून त्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, आर्थिक सहकार्याची आवश्यकता आणि स्वयंरोजगाराच्या उपलब्ध संधींबाबत चर्चा केली. महिलांनी व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मदत आणि आर्थिक पाठबळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. दिव्यांग पदवीधर महिलेने व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य मिळावे, अशी मागणी केली. यावर डॉ. गेडाम यांनी व्यवसायासाठी बँकांशी समन्वय साधून निश्चितपणे मदत करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.