नाशिक- आषाढी एकादशीचे औचित्य साधत शहरातील विठ्ठल मंदिरांत दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीचा सण पारंपरिक हर्षोल्हासात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने परिसरातील विठ्ठल मंदिरे फुलांची आरास, रोषणाईने सजली आहेत. बाजारात उपवासाच्या विविध पदार्थांसह फळे खरेदीसाठी आषाढीच्या पूर्वसंध्येला उत्साहाचे वातावरण अनुभवण्यास मिळाले.