Ashadhi Wari: बुधवारी दातली येथे होणार रंगणार पहिला रिंगण सोहळा; वारकऱ्यांची लाखोंनी असणार उपस्थिती

On the occasion of the arena ceremony at Datli, Nilesh Gadve, President, Nivrutinath Sansthan, Trambakeshwar, Adv.
On the occasion of the arena ceremony at Datli, Nilesh Gadve, President, Nivrutinath Sansthan, Trambakeshwar, Adv.esakal

विकास गिते

Ashadhi Wari : रिंगणी खेळतो वैष्णवांचा मेळा.. याचि देही याचि डोळा' टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठलाचे अभंग गात तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेत त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान नुकतेच ३ आणि ४ जूनला नाशिकमध्ये झाल्याने नाशिक नगरीत पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. (Ashadhi Wari First ringan ceremony to held at Datli on Wednesday of sant nivruttinath maharaj palakhi Lakhs of devotees will present nashik news)

त्यानंतर सिन्नर तालुक्यातील अवघड पास्ते घाट मार्गक्रमण करीत. दिंडी लवकरच सिन्नर तालुक्यात दाखल होणार असून संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या स्वागतासाठी अवघा सिन्नर तालुका सज्ज झाला असून लोणारवाडी, कुंदेवाडी येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करून मुक्काम व भोजनाची सोय करण्यात येते.

तसेच, लोणारवाडी, कुंदेवाडी येथे पुरणपोळी व रसाचे जेवण सर्व वारकरी यांना देण्यात येते. सिन्नर शहरातही अनेक ठिकाणी भक्तगण प्रसादाचे वाटप करीत असतात. संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचा प पहिला रिंगण सोहळा दातली येथे रंगणार असून. दातली येथे रिंग सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

रिंगण सोहळ्यासाठी लागणाऱ्या तीन ते चार एकर मध्ये जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. दातली येथील ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व वारकरी व त्र्यंबकेश्वर येथील विश्वस्त यांनी मागील आठवड्यात येत जेथे रिंगण होते तेथे भेट देत. रिंगण सोहळा बाबत माहिती घेतली.

यावेळी त्रंबकेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष निलेश गाढवे, तसेच सचिव अॅड सोमनाथ घोटेकर, पालखी प्रमुख नारायण मुठाळ, सिन्नर तालुक्याचे वारकरी भूषण एकनाथ महाराज गोळेसर, दातलीचे सरपंच हेमंत भाबड, प्रा. ई के भाबड, दामूजी आव्हाड, गुमन भाबड, शिवनाथ आव्हाड यांसह दातली येथील ग्रामस्थ उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ पालखीच्या स्वागतासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस तसेच वारकरी व नागरिक परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

On the occasion of the arena ceremony at Datli, Nilesh Gadve, President, Nivrutinath Sansthan, Trambakeshwar, Adv.
International Satsang Ceremony: समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळा

गोल रिंगण सोहळ्याचे महत्त्व जाणून घेऊया..

टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठलाचे अभंग आळवीत पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांना एका अनोख्या चैतन्याचे बळ मिळत असते. पण, सलग वाट चालत असताना वारीला काहीतरी वेगळेपण मिळाले, तर हे बळ द्विगुणीत होत असते. पालखी सोहळ्यातील हे वेगळेपण म्हणजेच रिंगण सोहळा

भान हरपून खेळ खेळतो,

दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..

भक्तिने भारलेला रिंगण सोहळा

पाहावा ‘याचि देही याचि डोळा’

रिंगण हा पालखी सोहळ्याचा एक अविभाज्य भाग असला, तरी वारीच्या परंपरेत त्याला वेगळे स्थान नाही. वारकऱ्यांची पाऊले वाटेवर असताना केवळ चालण्याबरोबर मध्येच काही खेळ खेळायला मिळाले, तर वारीचा आनंद वाढून पुढच्या वाटचालीचा उत्साह वाढतो.

त्यामुळेच या रिंगणाचे पालखी सोहळ्यामध्ये स्थान आहे. मुळात वारीच्या वाटेवर शिण, भार दूर करण्यासाठी काही खेळ खेळले जातात. वारीचा पालखी सोहळा झाला व त्यानंतर हा सोहळा एका शिस्तीत व दिमाखात पुढे जाऊ लागला.

शिस्तीची हीच परंपरा वारकऱ्यांच्या खेळातही आली अन् त्यातून शिस्तबद्ध रिंगण सोहळा निर्माण झाला.

वारीच्या वाटेवरील हे रिंगण सोहळे आता सुरू होणार आहेत. 7 जुनला दातली येथे दुपारी माउलीच्या सोहळ्याचे पहिले रिंगण होणार आहे. याच दिवशी . .

गोल रिंगण हा वारकऱ्यांच्या व भाविकांच्या दृष्टीनेही पालखी सोहळ्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. रिंगणासाठी एक मोठे मैदान सज्ज करण्यात येते. मैदानाची गोलाकार आखणी केली जाते.

On the occasion of the arena ceremony at Datli, Nilesh Gadve, President, Nivrutinath Sansthan, Trambakeshwar, Adv.
Gurumauli Annasaheb More: कुलधर्म, कुलाचार नव्या पिढीपर्यंत पोचवा : गुरुमाऊली

केंद्रभागी पालखी ठेवण्याची जागा, त्याच्या भोवती वारकरी उभे राहण्याची जागा व त्यानंतर अश्व धावण्याच्या गोलाकार जागेची आखणी केली जाते. या सर्व परिघाबाहेर भाविकांना उभे केले जाते. रिंगण सुरू होण्यापूर्वी ‘रिंगण लावणे’ हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

पालखी मार्गावरून रिंगणाच्या दिशेने येताना ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जातात व त्यानुसार एकेक दिंडी शिस्तबद्धपणे आखलेल्या रिंगणात दाखल होते. प्रत्येक दिंडीतील विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, झेंडेकरी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वेगवेगळ्या गटाने गोलाकार उभ्या राहतात.

पालखी व दिंडय़ा रिंगणात दाखल झाल्यानंतर शेकडो मृदंगाच्या व टाळांच्या गजरात लाखोंच्या मुखातून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा घोष करीत ठेका धरला जातो अन् रिंगण सोहळा सुरू होतो. झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला क्रमाने रिंगणातून धावतात.

शेवटी अश्व रिंगणात धावतात अन् रिंगण सोहळा आनंदाची सर्वोच्च पातळी गाठतो. त्यानंतर याच जागी फुगडय़ा घालण्याबरोबरच विविध खेळ रंगतात.

साठ ते सत्तर वयाच्या महिला, पुरुष वारकरी तरुणांनाही लाजवतील अशा आवेशात रिंगणात धावत असतात. वाटेवर चालून पाय थकतात, मग रिंगणात धावायला हे बळ येते कुठून, हे एक कोडेच आहे.

On the occasion of the arena ceremony at Datli, Nilesh Gadve, President, Nivrutinath Sansthan, Trambakeshwar, Adv.
Nashik News: सगर शिक्षण संस्थेत वरंदळांच्या 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग; मतदारांनी घडवले 'परिवर्तन'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com