Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

Why Rupali Chakankar Wasn't Summoned? Tejaswi Satpute Clarifies Probe in Ashok Kharat Case: ''पीडित महिलांनी पुढे येऊन गुन्हा दाखल केल्याने आम्ही खरातवर कारवाई करू शकलो. पीडितांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.''
Nashik SIT Press ashok kharat

Nashik SIT Press ashok kharat

esakal

Updated on

Ashok Kharat Crime: नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास एसआयटीकडे दिलेला आहे. एसआटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. शिवाय या प्रकरणात काही विशिष्ट लोकांची चौकशी का होत नाही? असा आरोप सुषमा अंधारेंसह अनेकांनी केला आहे. त्यालाही तेजस्वी सातपुते यांनी कुणाचंही नाव न घेता उत्तर दिलं.

तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्यांचा तपास SIT मार्फत करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात एकूण ११ गुन्हे SIT कडे तपासासाठी आहेत. २४ जणांचं तपास पथक असून अशोक खरात विरोधात नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये मिळून १२ गुन्हे दाखल आहेत. यातील ९ गुन्ह्याचा तपास SIT, २ गुन्हे अहिल्यानगर आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com