भोंदू खरात आज न्यायालयात

भोंदू खरात आज न्यायालयात
Published on: 
भोंदू अशोक खरात आज न्यायालयात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : महिलांच्या लैंगिक शोषणासह कापड व्यावसायिकाला व्यापारवृद्धीच्या नावाखाली सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यास सोमवारी (ता. ५) न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरात याने स्वतःला दैवी अवतार सांगत पीडित महिलांवर अत्याचार केला होता. या प्रकरणी १७ मार्च २०२६ ला सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर खरातला अटक करण्यात आली असता, एकापाठोपाठ एक नऊ गुन्हे दाखल झाले. यात आठ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे, तर दोन गुन्हे फसवणुकीचे आहेत. आतापर्यंत आठ गुन्ह्यांपैकी सहा गुन्ह्यांत दोषारोपपत्र सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले असून, अजून दोन दोषारोपपत्रे दाखल होणार आहेत. नेवासा (जि. अहिल्यानगर) येथील कापड व्यापाऱ्याच्या फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यात सरकारवाडा पोलिसांनी खरातला अटक केली आहे. खरातच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (ता. ५) संपत असल्याने त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरातने नेवासा येथील कापड व्यापाऱ्यांना व्यापारवृद्धीसाठी पूजाविधी सांगत त्यांच्याकडून सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे अडीच लाख रुपये उकळले होते. तसेच व्यापाऱ्याला सिद्ध अंगठी देत फसवणूक केली होती. याच प्रकरणी अंगठ्यांचा शोध व गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले. --------- जामिनावर गुरुवारी सुनावणी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचा संपूर्ण तपास राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून खरात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. तर, खरातने अत्याचाराच्या गुन्ह्यात न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर गुरुवारी (ता. ८) सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. खरातविरोधात लैंगिक अत्याचारासह फसवणूक व आर्थिक गैरव्यवहारासह सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेकायदा मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com