Ashok Sonawane
sakal
मुलांना विविध कलांची ओळख आणि त्यात आवड निर्माण होण्यासाठी, कलागुणांचा विकास करण्यासाठी, भविष्यातील कला क्षेत्रातील व्यावसायिक संधींसाठी तयार करण्यासाठी शालेय स्तरापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. हाच प्रयत्न शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील अशोक सोनवणे या शिक्षकाने केला. त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना कलेचा समृद्ध अनुभव मिळत आहे.