Nashik : अशोकस्तंभ दिसणार आता नव्या स्वरूपात

A proposed new form of Ashoka pillar in nashik
A proposed new form of Ashoka pillar in nashikesakal
Updated on

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेकडून वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या विकासाचा अनेक वर्षांपासून साक्षीदार असलेला अशोक स्तंभ चौक हा विकसित केला जाणार आहे. पंधरा लाख रुपये खर्च करून १५ ऑगस्टपर्यंत नाशिककरांना वाहतूक भेट समर्पित केला जाणार आहे. (Ashok Stambh will be seen in new from Nashik Latest Marathi News)

नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेकडून वाहतूक बेटे विकसित केली जात आहे. सामाजिक दायित्वाच्या नेतृत्वात वाहतूक बेटे विकसित करताना देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीदेखील संबंधित संस्थेवर देण्यात आली आहे.

राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयात शहराच्या सौंदर्यकरण करण्यासाठी समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने अशोक स्तंभ विकसित केला जाणार आहे. पंधरा लाख रुपये खर्च करून वाहतूक बेटाचे सुशोभीकरण केले जात आहे.

A proposed new form of Ashoka pillar in nashik
मुंबईतील बलात्कार घटनेतील फरार आरोपीस अटक

१५ ऑगस्टपूर्वी संपूर्ण काम केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाहतूक बेटामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. दीपक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स संचालक दीपक चंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून या कामासाठी मदत केली आहे.

पुढील दहा वर्षासाठी स्तंभाच्या देखभाल दुरुस्तीचे जबाबदारीदेखील घेतली आहे. स्तंभाच्या कामाचे डिझाईन आर्किटेक्ट विशाल घोटेकर यांनी केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कल्पनेवर सुशोभीकरण केले जाणार आहे.

A proposed new form of Ashoka pillar in nashik
Crime Update : हत्यारे बाळगून असलेल्या 2 संशयितांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.