इंदिरानगर: वडाळा येथील अशोका स्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालय आणि जेईई/आयआयटी फाउंडेशन शाखेचे शिक्षक प्रा. दिलीप ठाकूर यांनी शाळेत उत्तर महाराष्ट्रातील पहिली खगोलीय वेधशाळा आणि अंतरिक्ष प्रयोगशाळा उभारली असून केवळ शहरच नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकदेखील अवकाश दर्शनाचा लाभ घेत आहेत.