नाशिक- रोजंदारी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करीत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आंबुपाडा (बु.) (ता. कळवण) येथील शासकीय आश्रमशाळेचा मुख्याध्यापक माणिक बच्छाव याच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार या घटनेने खळबळ उडाली असून, बच्छावविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत कळवण प्रकल्पाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल न घेण्यात आल्याने बच्छावचे धाडस वाढत गेल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.