आश्रम शाळेच्या पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे; पालक संतप्त

School
Schoolesakal

पळसन (जि. नाशिक) : आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत कि कारागृहातील कैदी. असा संतप्त सवाल परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.

शाळेसह निवासस्थानाची दयनीय अवस्था

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरगाणा तालुक्यातील पळसन आश्रमशाळेला भेट देऊन वास्तवाचे आकलन करून विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच महत्वाच्या पदांवर कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शासकीय आश्रम शाळेला येथे भेट दिली असता, आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी मुले - १८९, मुली - १८८ एकुण ३७७ तसेच विनासवलत २६१ असे एकुण ६३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रोजच १०० टक्के विद्यार्थी हजर राहतात. मात्र या पडक्या इमारतीतही आदिवासी विद्यार्थ्यी आनंदाने ज्ञानाचे धडे घेत आहेत. या विद्यार्थाचे शिक्षण व मुलभूत सोयी सुविधांचे नियोजन करण्यासाठी केवळ १५ शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. या शाळेतील कर्मचारी सुद्धा पडक्या इमारतीत जिव मुठीत धरून राहतात. या आश्रम शाळेतील कर्मचारी यांना निवासाची सोय आहे, मात्र त्याही इमारती पडक्या आहेत. म्हणून बहुतांश कर्मचारी रोज घरुन ये-जा करतात.

School
सर्पदंश झालेल्या महिलेचा अंधश्रद्धेने घेतला बळी; उपचाराअभावी मृत्यू
शाळेसह निवासस्थानाची दयनीय अवस्था
शाळेसह निवासस्थानाची दयनीय अवस्थाesakal

न वापरताच फुटल्यात सोलरच्या काचा

निवासी विद्यार्थ्यीना राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या असणे गरजेचे असताना येथे अध्यापनाच्या खोलीतच विद्यार्थ्यांना राहणे व खाणे करावे लागते. पावसाळ्यात तर जिव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागते. शौचालय व स्नागृहांची संख्या कमी असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना उघड्यावरच बसावे लागते. आश्रमशाळेला स्वतंत्र टान्सफाॅर्मर नसल्याने वीजपुरवठा नेहमीच खंडित होत असतो. जनित्रासाठी राॅकेल मिळतं नाही व सौरऊर्जेचे बल्ब नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागते. अनेक ठिकाणी संरक्षण भिंत तुटल्याने विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेऊन राहावे लागते. या शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीने तळ गाठल्याने दुषित पाणी विद्यार्थ्यांना प्यायला मिळते तसेच अंघोळीसाठी शासनाने पाणी गरम करण्यासाठी लाखो रूपये खर्चून सोलर बसविले होते. मात्र वापर न करताच सोलरच्या काचा फुटल्या आहेत.

School
प्रतिकुलतेवर मात करणारा 'दीपक' बनला फौजदार; पंचक्रोशीत गौरव

उपोषणाला बसण्याचा पालकांचा इशारा

पावसाळ्यात विद्यार्थ्यांना कारागृहातील कैद्यांप्रमाणे राहावे लागते. या आश्रम शाळेत जाण्यासाठी रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या आश्रम शाळेतील सुधारणा करून विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा पुरवाव्यात अन्यथा आश्रम शाळेला कुलुप लावून उपोषणाला बसण्याचा पालकांनी इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com