अष्टाने येथे दोन खून

अष्टाने येथे दोन खून
Published on: 
अष्टाने येथे पत्नी, मुलाचा खून --- दारूच्या नशेत एकाचे कृत्य; स्वतःच्या डोक्यात मारला दगड सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २५ : अष्टाने ता. साक्री येथे रविवारी (ता. २५) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास नागेश ठाकरे (वय ३३) याने त्याची पत्नी बाईचीबाई ठाकरे (२८) व मुलगा रोहित (३) यांचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. ऊसतोडीसाठी जाण्याच्या पूर्वी साक्री येथील आठवडे बाजारातून खरेदी करून घरी जात असताना, रस्त्यात पती-पत्नीमध्ये भांडण झाले व त्याचे पर्यावसन खुनात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दारूच्या नशेत नागेश ठाकरे याने पत्नीशी वाद घालत तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले व त्यानंतर तीनवर्षीय मुलगा रोहित यासही त्याने दगडाने ठेचले. भांडणाचा राग व झालेल्या कृत्याचा पश्चाताप या संमिश्र भावनेने त्याने स्वतःच्या डोक्यावरही दगडाचा घाव घालून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जखमी झाल्याने व पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने जखमीस धुळे येथे पाठविण्यात आल्याचे कळते. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या इतरांवरही त्याने दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे. मुलगा व पत्नीचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाशेजारीच संशयित नागेश ठाकरे हा दारूच्या नशेत पडलेला आढळला. घटनाक्रम व त्यामागील कारण याबाबत साक्रीचे प्रभारी पोलिस अधिकारी तथा परिविक्षाधिन पोलिस उपविभागीय अधिकारी ओंकार गवळी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com