Ajit Pawar
sakal
नाशिक: विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी करत सातही जागांवर विजय मिळविला. या घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांचे “शाब्बास पठ्ठ्यांनो” असे शब्दांत कौतुक केले. जिल्हावासीयांनी दिलेल्या विश्वासाला सन्मान देत पवार यांनी नाशिक जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात तब्बल तीन मंत्रिपदे बहाल केली.