esakal | माणुसकी जिवंत आहे! स्वत:ची कार केली रुग्णवाहिका
sakal

बोलून बातमी शोधा

car

माणुसकी जिवंत आहे! रुग्णांसाठी स्वत:ची कार केली रुग्णवाहिका

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : कोरोना रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सामाजिक बांधिलकी जपत प्रभाग २५ मधील सामाजिक कार्यकर्ते, तसेच भाजप पदाधिकारी किरण गाडे हे स्वतःच्या कारमधून बाधित रुग्णांच्या घरापासून थेट रुग्णालय, तसेच कोविड सेंटरपर्यंत घेऊन जात आहेत. आजपर्यंत परिसरातील अनेक रुग्णांना त्यांच्या गाडीमुळे जीवनदान मिळाले आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

स्वतःच्या कारमधून रुग्णांना दाखल करण्यास मदत

किरण गाडे हे परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांना थेट स्वतःची कार घेऊन रुग्णालयात, तसेच कोविड सेंटरपर्यंत दाखल करण्यास मदत करत आहेत. नवी उमंग फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सेवा रुग्णांसाठी बजावत आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरासमोर मोफत नियमित निर्जंतुकीकरण फवारणी करणे, गरजूंना कोविड सेंटरमध्ये बेड मिळवून देणे, बाधित रुग्णांच्या घरी मोफत जेवणाचे डबे देणे या प्रकारची लोकोपयोगी कामे या फाउंडेशनमार्फत केली जात आहे. कामटवाडे, अभियंतानगर या परिसरात जे कुणी कोरोना रुग्ण आढळून येतील त्यांच्या घरासमोर मोफत निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.

loading image