अस्तंबा ऋषी यात्रेत हजारो भाविकांची मांदियाळी

अस्तंबा ऋषी यात्रेत हजारो भाविकांची मांदियाळी
Published on: 
(पान ४ ला मेन) फोटो : NSK26H34617 अस्तंबा : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अस्तंबा ऋषींचे स्थान असलेला ‘अस्तंबा’ डोंगर. फोटो : NSK26H34620 अस्तंबा : यात्रेदरम्यान डोंगरावर विश्रांती घेताना भाविक. फोटो : NSK26H34622 अस्तंबा : यात्रा उत्सव समितीतर्फे भाविकांसाठी करण्यात आलेली मंडपाची सुविधा. फोटो : NSK26H34618 अस्तंबा : भीमकुंडात स्नान करताना. ------------- अस्तंबा यात्रेत हजारो भाविकांची मांदियाळी! चार हजार फूट उंचीवर शिखर : सातपुड्यातील पर्वतरांगांमध्ये भक्तीमय वातावरण सकाळ वृत्तसेवा पिंपळोद, ता. ६ : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अस्तंबा ऋषींच्या पवित्र स्थानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीच्या पर्वावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. ‘सिंगरवाले बाबा की जय, अस्तंबा ऋषी की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण पर्वतरांग दुमदुमून गेली. सातपुडा पर्वत रांगेतील चार हजार फूट उंचीवरील शिखरावर दर्शनासाठी नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेशातील हजारो आदिवासी बांधवांची गर्दी होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने याठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिखरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. भाऊबीजेपर्यंत हा यात्रोत्सव सुरू असतो. --------- सातपुडा पर्वतरांगांमध्ये तळोदा तालुक्यात असलेले अस्तंबा हे आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेले पवित्र धार्मिक स्थळ आहे. दीपावलीच्या पर्वात धनत्रयोदशीच्या दिवशी अस्तंबा ऋषींची यात्रा भरत असते. यात्रेसाठी नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील विविध भागांतून हजारो भाविक पदयात्रेने अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी येतात. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासूनच भाविकांची यात्रेसाठी तयारी सुरू होते. धनत्रयोदशीच्या पहाटेपासूनच भाविकांचा ओघ वाढू लागतो. डोक्यावर टोपल्या, हातात भगवे ध्वज आणि गळ्यात माळा घालून भाविक भक्तिभावाने अस्तंबा यात्रेकडे मार्गक्रमण करतात. विविध भागांतून पायी चालत, डोंगरदऱ्या पार करत हजारोंच्या संख्येत भाविक अस्तंबा येथे पोहोचतात. अस्तंबा ऋषींचे स्थान उंच डोंगरावर असल्याने भाविकांना शिखरापर्यंतचा प्रवास पायी करावा लागतो. भाविकांना रोमांचकारी अनुभव अस्तंबा परिसरात पोहोचल्यानंतर भाविक विधिवत पूजा करून ऋषींचे दर्शन घेतात. शिखरावर पोहोचण्यासाठी असलेला कठीण डोंगरमार्ग, घनदाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर यामुळे ही यात्रा भाविकांसाठी श्रद्धा आणि जिद्दीचा अनोखा संगम ठरते. सातपुड्यातील पर्वतरांगांमध्ये असलेल्या उंच डोंगर, खोल दऱ्या, नागमोडी पायवाटा आणि खडतर चढ-उतार पार करीत भाविक अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी पोहचतात. त्यामुळे भाविकांना श्रध्देसोबतच ट्रॅकींगचाही अनुभव येत असतो. हा अनुभव यात्रेकरूंसाठी रोमांचकारी ठरत असतो. बालगोपाळांचाही समावेश यात्रेत बालगोपाळांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. लहान मुलांचाही पदयात्रेत सहभाग दिसून येतो. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत भाविक मोठ्या श्रद्धेने अस्तंबा ऋषींचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना व्यक्त करतात. धनत्रयोदशीच्या या धार्मिक पर्वामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीने अस्तंबा यात्रेला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून, आदिवासी समाजाच्या धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक श्रद्धेचे दर्शन या यात्रेतून घडते. ------ सोंगाड्या पार्ट्यांच्या नाट्यपरंपरेतून प्रेरणा डोगे दिवाळी अर्थात आहट्यादेव पूजन ही आदिवासी बांधवांची परंपरा असून, यात पवित्र स्नान, पालनी (व्रत) डफ आणि पावलीच्या तालावर नृत्य तसेच रोशा वनस्पती आणि ज्वारीचे कणीस अर्पण करण्याचे विधी केले जातात. या परंपरेतून आरोग्य, धनधान्यवृध्दी, सामूहिक सहकार्य आणि निसर्गाशी असलेले नाते जपण्याचा प्रयत्न केला जातो. सोंगाड्या पार्ट्यांच्या नाट्यपरंपरेला या पुजनातून सांस्कृतिक प्रेरणा मिळत असते. यात्रेदरम्यान भाविक देरानी- जेठानी, गोऱ्यामाळ, नकट्यादेव, काकडीस्थान, जुना अस्तंबा, भीकुंड, डुगडुग्या पत्थर आणि मामा- भांजा या ठिकाणांना भेट देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.