सटाणा- शहरात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या पथकाने शहर व तालुक्यात छुप्या मार्गाने गुटखा पुरवठा करणाऱ्या मुख्य विक्रेत्याकडे रात्री छापा टाकून तंबाखूजन्य पदार्थ असलेला लाखो रूपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी मुद्देमालासह एकास अटक केली असली तरी मुख्य गुटखा विक्रेता आसिफ तांबोळी पोलिसांना चकवा देत फरार झाला.