धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- एटीएमशी छेडछाड; दोघांविरुद्ध गुन्हा धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएम केंद्रात मशीनच्या रचनेत छेडछाड करून बँक व ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. दोन अनोळखी व्यक्तींनी २७ सप्टेंबरला सकाळी एटीएम केंद्रात प्रवेश करून मशीनमध्ये विशेष चिप बसविल्याचे बँकेच्या शाखाधिकारी संगीता योगेंद्रसिंग गिरासे यांच्या फिर्यादीनुसार समोर आले. या माध्यमातून एटीएममधील बँकेची रक्कम तसेच ग्राहकांच्या व्यवहारातील रोकड परस्पर लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. - वाटणीवरून हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा धुळे : घराच्या हिस्सेवाटणीच्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना आझादनगर भागात घडली. सलमान जब्बार सय्यद (रा. सुरत, गुजरात) हे आझादनगर येथे आले असता जुनेद याकूब पठाण, याकूब हमज खान पठाण, समिना याकूब पठाण (सर्व रा. हजारखोली, आझादनगर, धुळे) व साजिद सय्यद (रा. चांदवड, जि. नाशिक) यांनी हिस्सेवाटणीच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. यावेळी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर जुनेद पठाण याने तलवारीने सय्यद यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यावरून चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - एसडीओ आवारातून गौणखनिज ट्रॅक्टरचोरी धुळे : महसूल विभागाने गौणखनिजाची वाहतूक करताना पकडून जप्त केलेले व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरक्षेसाठी ठेवलेले विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर चोरीला गेले. ही घटना २९ ते ३० सप्टेंबरदरम्यान घडली. दोन लाख सहा हजारांचे ट्रॅक्टर चोरीला गेल्याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - शेताच्या विहिरीवरील दोन मोटारी चोरीला धुळे : अकलाड (ता. धुळे) गावशिवारातील शेतातील विहिरीवर बसविलेल्या दोन पाण्याच्या मोटारी चोरट्यांनी लांबविल्या. विवेक पोपट जाधव यांच्या शेतातील विहिरीवर दहा हजारांची पाणबुडी मोटार व दहा हजारांची इलेक्ट्रिक पाण्याची मोटार बसविलेली होती. तीन ऑक्टोबरदरम्यान दोन्ही मोटारी चोरीला गेल्या. याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com