Nashik | गौणखनिज चोरांचा महसूलच्या पथकावर हल्ला

crime news
crime newsesakal

वडनेर भैरव (जि. नाशिक) : वडनेर भैरव परिसरात मुरूम वाहतूक करणाऱ्या हायवा चालक व मालकांनी चांदवड तहसीलदार कार्यालयाकडून नेमण्यात आलेल्या पथकावर हल्ला केल्याचा प्रकार गुरूवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडला. संबंधितांवर वडनेर भैरव पोलिस ठाण्यात सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहादुरी येथील तलाठी यू. यू. मेहेर, खडकजांबचे योगेश देसले, वडनेर भैरवचे जी. एम. गुंडरे, वडाळीभोईचे एस. एस. काकड यांच्या पथकाला अवैध गौणखनिज उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास बहादुरी - तिसगाव मार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावरील (क्र. एमएच - ०५ - एएम - १६१०) चालकाला वाहन पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले. मात्र, वाहन मालक जितेंद्र निकम (रा. पिंपळगाव बसवंत) याच्या सांगण्यावरून चालकाने वाहन अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालक व मालक वाहनासह पिंपळगावच्या दिशेने फरार झाले. याप्रकरणी गाडीमालक जितेंद्र निकम व चालकाविरोधात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
खूनसत्राने हादरले नाशिककर; महिनाभरात चार खून

स्थानिकांना होते दमबाजी

वडनेर भैरव, वडाळी भोई, बहादुरी याठिकाणी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. शासनाचा महसूल बुडवून मोठ्या प्रमाणात मुरुम व इतर गौण खनिजाची चोरटी वाहतूक केली जाते. यातून त्यांना मोठा आर्थिक फायदा होत असून, परिसरात त्यांच्याविरुद्ध कोणी आवाज उठवला तर त्यांना दमबाजी करण्याचे प्रकारही सुरू आहे. महसूल यंत्रणेने याठिकाणी पंचनामे करुन सदर व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

crime news
नाशिक : भाजपचा फटाका, आयुक्त ठरवणार फुसका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com