recruitment
recruitmentesakal

शाळाच नाही अन् नोकरभरतीचा प्रयत्न! इगतपुरीतील प्रकार

इगतपुरी (जि.नाशिक) : बेरोजगारांच्या परिस्थितीचा फायदा घेत इगतपुरी तालुक्यातील एका तथाकथित शिक्षण संस्थेने शासनातंर्गत मान्यताप्राप्त असल्याचा हवाला देत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नोकर भरतीचा घाट घातला होता. या संस्थेच्या विविध २९ पदांच्या मुलाखतीसाठी राज्यभरातून सुमारे दीड हजारावर युवक-युवती आज इगतपुरीत आलेले होते. परंतु या नोकरभरतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला.

नोकरभरतीत एक धक्कादायक प्रकार समोर

इगतपुरी तालुक्यातील एका तथाकथित शिक्षण संस्थेने शासनातंर्गत मान्यताप्राप्त असल्याचा हवाला देत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नोकर भरतीचा घातलेला घाट माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. ही भरती रद्द करण्यात आली असून सबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बेरोजगारांच्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांना गंडविणाऱ्या त्या संस्थाचालकांविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे. या संस्थेच्या विविध २९ पदांच्या मुलाखतीसाठी राज्यभरातून सुमारे दीड हजारावर युक-युवती आज इगतपुरीत आलेले होते. बोडके यांनी संस्था शासनातंर्गत मान्यताप्राप्त असण्याबाबत शंका घेत सत्यता पडताळून पाहिली असता संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे कुठलीही संस्था अस्तित्वात नसून मान्यताही नाही असे समजल्याने या संस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. खेर संस्थेने शुक्रवारी (ता.१७) योजित केलेल्या मुलाखती अकस्मात कोरोनाचे तांत्रिक कारण देत रद्द केल्या आहेत. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार इगतपुरीत किंवा आवळखेड येथे ही शाळाच अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांची फसवणूक टळल्याची जिल्हाभरात चर्चा सुरु झाली आहे.

recruitment
नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या पुन्‍हा हजाराच्‍या उंबरठ्यावर

माजी जि. प. सदस्यांच्या सतर्कतेने बेरोजगारांची फसवणूक टळली

सामाजिक व न्याय विभागाचा हवाला देत मान्यताप्राप्त निवासी व अनिवासी आश्रमशाळा असल्याचा दावा करत यार तथाकथित शैक्षणिक संस्थेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा घाट घातला होता. त्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. सामाजिक न्याय विभागाची आश्रमशाळा अशी जाहिरात होती. याबाबत शहानिशा करण्यासाठी श्री. बोडके यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे कक्ष अधिकारी मोरे यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता शासनस्तरावर अशा पद्धतीची आश्रमशाळा वा शाळा मान्यताप्राप्त नसल्याची माहिती उजेडात आली. अशा कोणत्याही शिक्षक भरतीला परवानगी दिली नसल्याची माहिती कक्षातून मिलाल्याचे गोरख बोडके यांनी सांगितले.

recruitment
"..तर काही दिवसातच गोदावरीला पुर्नवैभव प्राप्त करून देऊ"

इगतपुरीतील प्रक्रिया रद्द

यानंतर बोडके यांनी संस्थेच्या चालकास जाब विचारला असता सबंधिताचे पितळ उघडे पडले. बोडके यांच्या सतर्कतेमुळे बेरोजगार व सुशिक्षित युवती व युवकांची होणारी संभाव्य फसवणूक टळली आहे. फसवणुकीचे उद्योग करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी बोडके, खरेदी विक्री संघाचे ज्ञानेश्वर लहाने, शहराध्यक्ष वसीम सैयद, शहर उपाध्यक्ष प्रविण कदम, मदन कडू, नारायण वळकंदे, ज्ञानेश्वर पासलकर, राजू गांगड, पोपटराव भागडे आदींनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com