SBI ATM फोडण्याचा प्रयत्न; संशयित तत्काळ जेरबंद | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Squad personnel with suspects in SBI Bank ATM break-in attempt.

SBI ATM फोडण्याचा प्रयत्न; संशयित तत्काळ जेरबंद

जुने नाशिक : शिंगाडा तलाव येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार शुक्रवार (ता.२९) पहाटे चारच्या सुमारास घडला.

भद्रकाली गुन्हे शोध पथकाने माहिती मिळताच अवघ्या काही वेळातच संशयितास सारडा सर्कल भागातून ताब्यात घेतले. शाहीद परवेझ गुलाम मुर्तझा शेख (३०, रा. मोमीन पुरा, गांधी पार्क, नागपूर) असे संशयिताचे नाव आहे. (Attempt to break into SBI ATM Suspect immediately jailed nashik crime Latest Marathi News)

संशयिताने शिंगाडा तलाव जैन मंदिर परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो प्रयत्न फसला. बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयास जोडलेल्या यंत्रणेद्वारे माहिती मिळाली.

त्यांनी लगेचच नाशिक शहर पोलिस कंट्रोल विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यांनी भद्रकाली पोलिसांना याबाबत कळविले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, गुन्हे शोध पथकाचे कय्यूम सय्यद, गोरख साळुंखे, विशाल काठे, संजय पोटिंदे, नितीन भांबरे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले.

हेही वाचा: गितेंनी कोणत्याही गटातून उमेदवारी करावी; कार्यकर्त्यांची मागणी

त्यात संपूर्ण घटना तसेच संशयिताचा चेहरा स्पष्ट दिसला. पथक सर्वत्र शोध घेत असताना कय्यूम सय्यद आणि गोरख साळुंखे यांना संशयित सारडा सर्कल भागात फिरत असल्याचे आढळले. पोलिसांची चाहूल लागतात संशयिताने पळ काढण्याचा प्रयत्न केला.

श्री. सय्यद आणि श्री. साळुंखे यांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावर ताब्यात घेतले. एसबीआय बँकेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आणि गुन्हे शोध पथकाच्या तप्तरतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. ...

हेही वाचा: राज्यपालांनी वादविवाद होईल असे वक्तव्य टाळावे : छगन भुजबळ

Web Title: Attempt To Break Into Sbi Atm Suspect Immediately Jailed Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top