Religion Conversion Crime : वाडिवऱ्हे येथे धर्मांतराचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

Conversion Crime : वाडिवऱ्हे येथे धर्मांतराचा प्रयत्न

वाडिवऱ्हे (जि. नाशिक) : वाडीवऱ्हे येथे ख्रिश्चन मिशनरीचे प्रचारक येऊन आदिवासींची दिशाभूल करून धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. (Attempted conversion at Wadivarhe of tribal woman nashik crime news)

प्रथम आदिवासी कुटुंबात येऊन येशूची प्रार्थना शिकवण्यापासून सुरवात करतात. असाच प्रकार येथे उघड झाला आहे. येथील सरपंच रोहिदास कातोरे यांनी व गावकरींनी या मिशनरींना समजावून सांगितले. देवळाली कॅम्प येथील अजितकुमार (बिहार) व डेल्टा कंपनी कामगार व त्यांचे सहकारी वाडीवऱ्हे गावातील मोहन अस्वले यांच्या विधवा पत्नी व मुलगी यांना येशूची प्रार्थना शिकवत असताना सरपंच व कार्यकर्ते तेथे गेले, तेव्हा हा प्रकार लक्षात आला.

"प्रत्येक नागरिक जन्मापासून त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करीत आहे. आपण आदिवासी अशिक्षित कुटुंबात अंधश्रद्धेला प्रोत्साहन देऊन धर्मांतराची पहिली पायरी रोखावी."

- रोहिदास कातोरे, सरपंच वाडीवऱ्हे

"आम्ही कोणत्याही धर्मावर अतिक्रमण करीत नाही. आमच्या धर्मावर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास सहन केले जाणार नाही. यापुढे आम्ही समजून सांगणार नाही तर थेट कृती केली जाईल." - गणेश गवते, विश्व हिंदू परिषद, वाडीवऱ्हे.