Tathagat Mahanatya : ऐतिहासिक महानाट्याला हजारो सातपूरकरांची उपस्थिती

Actor performing Tathagata Mahanathya.
Actor performing Tathagata Mahanathya.esakal

Tathagat Mahanatya : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त सातपूर शहर भीम महोत्सव समिती आयोजित महानाट्य तथागत सादर करण्यात आले. रविवार (ता. १६) हे महानाट्य बघण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित व डॉ. शैलेंद्र बागडे प्रस्तुत तथागत या महानाट्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. (Attendance of thousands of Satpurkars at historical Mahanatya nashik news)

महानाट्यात तथागत भगवान गौतम बुद्धाच्या संपूर्ण जीवनपट मांडण्यात आला. या महानाट्याचा प्रयोग सातपूर शहरात पहिल्यांदाच झाल्याने आजूबाजूच्या खेड्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील वर्षी भीम महोत्सव समितीने डॉ. भीमराव आंबेडकर हे महानाट्य पहिल्यांदाच सातपूर शहरात सादर केल्यानंतर हजारो नागरिकांनी या महानाट्यास बघण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती. याही वर्षी मोठ्या प्रमाणात भीमसागर उसळला होता.

याकरिता समता सैनिक दलासह सुरक्षा व्यवस्था सुरक्षारक्षक तैनात होते. महापालिका आरोग्य विभाग, अग्निशमन दल तसेच पोलिस प्रशासन सज्ज होते. भन्ते यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेऊन कार्यक्रम सुरू झाला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Actor performing Tathagata Mahanathya.
Ramzan Eid : ईदगाह मैदानावरील कामांना वेग; महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी

मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम महोत्सव समितीने आलेल्या सत्कारमूर्तींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. कार्यक्रमाला माजी सभागृहनेते दिनकर पाटील, माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख, ठाकरे सेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी नगरसेविका इंदूबाई नागरे, मायाताई काळे आदी उपस्थित होते.

या वेळी कोर कमिटीचे सदस्य रवींद्र छबूराव काळे, माजी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, अरुण काळे, काळूजी काळे, नंदकुमार जाधव, योगेश गांगुर्डे, बजरंग शिंदे, शिवाजी काळे, रवींद्र बाबूराव काळे, विजय तिवडे, नितीन बाळा निगळ, नीलेश भंदुरे, विजय अहिरे, दशरथ लोखंडे, गजानन दीपके, आदेश पगारे, अविनाश शिंदे, सागर जारे, मनोज पगारे, वैभव महिरे उपस्थित होते.

Actor performing Tathagata Mahanathya.
NMC News : दीड महिन्यात 2352 अनधिकृत फलक हटविले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com