ZP, Panchayat Samiti Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष

Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi News
Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi Newsesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांना जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यामुळे आता अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या गप्पांचे फड रंगू लागले आहे. (Attention to Zilla Parishad Panchayat Samiti Election nashik news)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi News
Nashik News : येवल्यात लाल कांद्याच्या आवकला सुरवात; बाजारभाव स्थिर

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. या निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कडे लागले आहेत. त्यादृष्टीने इच्छुकांकडून मोर्चे बांधणीस देखील सुरवात केली जात आहे. ग्रामीण भागातून नेतृत्व करणारी कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. तालुका पातळीवर नेतृत्व करणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची संधी दिली जाते.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार रिंगणात होते. यात अनेकांना बाजी देखील मारली आहे. त्यामुळे गट आणि गणांची तयारी करणाऱ्यांमध्ये तरुणांचा भरणा अधिक असेल यात शंका नाही. अद्याप जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात शासनाकडून कुठलीही घोषणा झाली नसली तर इच्छुक मात्र तयारीला लागले आहे.

Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi News
Christmas Festival : नाशिक रोड परिसरात नाताळ उत्साहात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
All 10 Chakur Panchayat Samiti Members Unite Against Block Development Officer
New executive committee of Pune District Taluka Panchayat Samiti Chairperson Association announced with Kailas Kale as President
Marathi News Esakal
www.esakal.com