Prakash Purab : मनमाडच्या गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई; सालाना जोडमेलाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Attractive illumination of the Gurdwara here on the occasion of Prakash Purab of Guru Gobind Singhji Maharaj.

Prakash Purab : मनमाडच्या गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई; सालाना जोडमेलाचे आयोजन

मनमाड (जि. नाशिक) : शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील प्रसिद्ध गुरुद्वारा म्हणून ओळख असलेल्या शहरातील गुप्तसर साहिब गुरुद्वारामध्ये दरवर्षी गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या प्रकाश पूरबनिमित्त सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले आहे. (Attractive illumination of Manmad Gurdwara Organized prakash purab Jodmela every year nashik news)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : गणेशनगर येथील खडीक्रेशर सील; विनापरवाना उत्खननावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

यावर्षीच्या श्री गुरू गोविंदसिंगजी महाराजांच्या ३५६ व्या पावन प्रकाश पूरबनिमित्त १६, १७ आणि १८ डिसेंबर रोजी गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अखंड पाठ, भजन, कीर्तन, लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उत्सवास शुकवारपासून प्रारंभ झाला. सालाना जोडमेलानिमित्त गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सवात अनेक राज्यातील शीख बांधव, मान्यवर आणि कलाकार सहभागी होणार आहेत.

रविवारी (ता. १८) दुपारी तीनला गुरुद्वारापासून मनमाड शहरामध्ये भव्य स्वरूपात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात सर्वधर्मिय नागरिक आणि भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंहजी यांनी केले आहे.

हेही वाचा: Rajya Natya Spardha : ‘मोनोटोनी’तला सुवर्णमध्य ‘सौभाग्यवती चिरंजीव’!

टॅग्स :Nashikfestivalmanmad