Atul Save | प्रस्ताव छाननीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष : अतुल सावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Save

Atul Save | प्रस्ताव छाननीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष : अतुल सावे

नाशिक : विविध विकास कार्यकारी सोसायट्यांच्या नोंदण्यासाठीचे प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून द्यावेत याविषयी आपल्या विधानाचा विपर्यास केला जातोय.

प्रस्ताव देताना ते जर भाजप जिल्हाध्यक्षांकडून आले तर एकसूत्रीपणा राहील म्हणून भाजप जिल्हाध्यक्षांकडून प्रस्ताव यावेत, असे म्हटलो असल्याचे स्पष्ट करीत सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज पुन्हा सोसायटी नोंदणी भाजप जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून व्हाव्यात, या विधानावर ठाम राहिले. (Atul Save statement BJP District President for Proposal Scrutiny nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सहकार मंत्र्यांच्या विधानाने गदारोळ उडाला आहे. आज नाशिकला पुन्हा त्याच विधानाचा पुनरुच्चार करीत श्री सावे यांनी भाजप जिल्हाध्यक्षांकडून प्रस्ताव येण्याने त्यांची छाननी होऊन सुसूत्रता येईल, असे स्पष्टीकरण दिले.

अधिकारी कशासाठी ?

विविध विकास सोसायट्यांच्या प्रस्ताव भाजप जिल्हाध्यक्षांकडून यायचे असल्यास मग सहकार विभागाचा अधिकाऱ्यांवर विश्वास नाही का? की सहकार सोसायट्या नोंदणी भाजपच्या यंत्रणेच्या देखरेखखाली करायची आहे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सहकार मंत्र्यांचे विधान चर्चेत आले आहे.