Crime
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर रोडवरील आयटीआय सिग्नल येथील औरा बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात पीएल ग्रुपच्या लोंढे टोळीतील आणखी एकाला जेरबंद करण्यात आले आहे. घटनेनंतर फरारी झालेल्या या सराईत गुन्हेगाराच्या मीरा-भाईंदरमध्ये पहाटे गाढ झोपेत असताना मुसक्या आवळल्या. शहर गुन्हे शाखेच्या अंबड गुन्हे शाखेने ही कारवाई केली. निखिलकुमार मधुकर निकुंभ (वय ४१, रा. डीजीपीनगर-३, खुटवडनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.